यवतमाळ महाराष्ट्र
अतिवृष्टीमुळे अचंबित करणारी घटना महागाव तालुक्यात घडली असून एका शेतकऱ्याची 72 फूट खोल विहीर जमीन ढासळून बांधकामासह कोसळली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्याचे दोन लाख पाच हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
काल21 जुलै ला आलेल्या पावसाने उटी येथील शेतकरी शेत सर्वे न महागाव 163 मधील विहीर पूर्णपणे पडली. बबनराव रामराव गावंडे असं ह्या शेतकऱ्यांचं नावं आहे.
बबनराव ह्यांची विहीर पूर्ण पडली असून 250000 लाखाचे नुकसान झाले आहे शेतकरी पूर्णपणे हतबल असून त्यांना मानसिक ताण येत आहे शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी तहसीलदार ह्यांना अर्ज देऊन केली आहे.

महागाव तालुक्यात यावर्षी सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पीक परिस्थिती अत्यंत जोमदार होती. मात्र जुलै महिना सुरू झाला आणि अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान होऊ लागले. शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.व विहिरिही तुडुंब भरल्या आहे.
काही दिवसांपासून जोराचा पाऊस पडत असल्याने विहिरीच्या बाजूची जमीन खचली जाऊन बांधकाम केलेली विहिरी अक्षरशः जमीनदोस्त झाली. विहिरीवर टाकण्यात आलेली विद्युत मोटार पाईपसह जमिनीत गाढली गेली आहे. संबंधित शेतकऱ्याने पंचनामाकरून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
जिल्हा प्रतिनिधी- केतकी विशाल पांडे